मुंबई

अंबा नदीतील मासे नकाे रे बाबा!

सकाळ वृत्तसेवा

पाली : अंबा नदी ही सुधागड तालुक्‍याची जीववाहिनी म्हणून ओळखली जाते. याच नदी पात्रात जांभूळपाडा गावाजवळ मंगळवारी (ता. 18) मोठ्या प्रमाणावर मृत मासे आढळून आले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. विषामुळे ते मृत झाल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. 

जांभूळपाडा परिसरातील अनेक गावांतील नागरिक अंबा नदीचे पाणी पिण्यासाठी वापरतात. त्यामुळे मासे मृत झाल्याची माहिती पसरल्यानंतर उलटसुलट चर्चा सुरू झाली. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सोमावारी (ता. 17) रात्री अज्ञात व्यक्तीने मासेमारी करण्यासाठी नदी पात्रात विष टाकले असावे. या घटनेनंतर पाणी दूषित झाल्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तीवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

अंबा नदीपात्रात मासे मृत होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. ही बाब अतिशय संतापजनक आहे. त्यामुळे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी. 
- संदेश लोंढे, ग्रामस्थ 

अंबा नदीतील मृत माशांबाबत माहिती मिळताच ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्याने तातडीने घटनास्थळी पाहणी केली. त्याला त्या ठिकाणी कोणती संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळून आली नाही. खबरदारी म्हणून जांभूळपाड्याजवळच्या वऱ्हाड गावालाही खबरदारीचा इशारा दिला आहे. 
- जितेंद्र म्हात्रे, ग्रामविकास अधिकारी, जांभूळपाडा 

अंबा नदीच्या जांभूळपाडा येथील पात्रात अनेक वेळा अशा प्रकारे मासे मृत होण्याचे प्रकार घडले आहेत. विषप्रयोगाची दाट शक्‍यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे. 
- बरकत पठाण, ज्येष्ठ नागरिक, जांभूळपाडा 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्माचे शतक! शुभमन गिलसोबत विक्रमी भागीदारी; गांगुली-तेंडुलकर यांचा १९९८ चा विक्रम संकटात...

Satara DJ Rules: सण-उत्सवात डीजेचा आवाज वाढवला तर खिसा रिकामा! व्यक्तीला ५० हजार, मंडळांना १ लाखांची अनामत

SCROLL FOR NEXT